दहशतवादी अब्दुल करीम उर्फ टुंडाची सुटका

नवी दिल्ली, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : देशात झालेल्या चाळीस बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याचा आरोप दहशतवादी अब्दुल करीम उर्फ टुंडावर केला जातो. टुंडा विरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ३३ प्रकरणांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तपास पथकाने टुंडावर १९९३ मध्ये वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला होता. टुंडा विरोधात टाडा अंतर्गत खटला सुरू होता. अखेर अजमेरच्या […]

दहशतवादी अब्दुल करीम उर्फ टुंडाची सुटका

नवी दिल्ली, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : देशात झालेल्या चाळीस बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याचा आरोप दहशतवादी अब्दुल करीम उर्फ टुंडावर केला जातो. टुंडा विरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ३३ प्रकरणांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तपास पथकाने टुंडावर १९९३ मध्ये वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला होता. टुंडा विरोधात टाडा अंतर्गत खटला सुरू होता. अखेर अजमेरच्या टाडा न्यायालयाने गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी अब्दुल करीम उर्फ टुंडाची सुटका केली. न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी इरफान आणि दहशतवादी हमीमुद्दीन या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

देशात ६ डिसेंबर १९९३ रोजी राजस्थानमधील कोटा, उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि कानपूर, आताच्या तेलंगणातील आणि तेव्हाच्या आंध्र प्रदेशमधील हैदराबाद, गुजरातमधील सूरत, महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी रेल्वे गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २०२४ रोजी टाडा न्यायालयाने सोळा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नंतर दोषी ठरवलेल्या सोळा पैकी चार जणांची सुटका केली आणि बारा जणांना दोषी ठरवले. पण टुंडा फरार होता त्याच्या विरोधातील खटले प्रलंबित होते.

ऑगस्ट २०१३ मध्ये भारत – नेपाळ सीमेजवळून अब्दुल करीम उर्फ टुंडाला अटक करण्यात आली. पण ठोस पुरावे नसल्याचे कारण देत टाडा न्यायालयाने अब्दुल करीम उर्फ टुंडा याची सुटका केली.

अब्दुल करीम उर्फ टुंडा
१९५६ – चोरीच्या प्रकरणात आरोप
१९८१ – घर सोडले
१९९३ – साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी
२०१३ – भारत – नेपाळ सीमेजवळ पकडले
२०२४ – टाडा न्यायालयाने केली सुटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number