मुंबई , २८ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचा ट्रेंड सुरु आहे. बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसात आपले लग्न उरकले अलीकडेच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्यापाठोपाठ आता लवकरच अभिनेत्री तापसी पन्नू देखील लग्न करणार आहे. मार्चच्या अखेरीस तापसी तिचा बॉयफ्रेंड मथियास बो यांच्यासोबत लग्न करणार असून त्यांचं लग्न सोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे.
मथियास बो कोण आहे ?
मॅथियास बो हा बॅडमिंटनपटू आहे. त्याने २०१५च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले असून तो २०१२ आणि २०१७ मध्ये दोन वेळा युरोपियन चॅम्पियन आणि 2012 ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक विजेता ठरला आहे.