खासदार गोडसेंच्या वाहनाला अपघात

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाला दिल्लीत अपघात झाला. या अपघातातून खासदार हेमंत गोडसे वाचले आहेत. त्यांना मोठी दुखापत झालेली नाही. पण खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. खासदार हेमंत गोडसे दिल्लीच्या बी डी मार्गावरून वाहनाने प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना खासदार गोडसेंच्या वाहनाला […]

खासदार गोडसेंच्या वाहनाला अपघात

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाला दिल्लीत अपघात झाला. या अपघातातून खासदार हेमंत गोडसे वाचले आहेत. त्यांना मोठी दुखापत झालेली नाही. पण खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

खासदार हेमंत गोडसे दिल्लीच्या बी डी मार्गावरून वाहनाने प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना खासदार गोडसेंच्या वाहनाला पाठीमागून दुसऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात गोडसेंच्या वाहनाचे नुकसान झाले. पण वाहनात असलेले खासदार हेमंत गोडसे आणि त्यांच्यासोबतची एक व्यक्ती असे दोघेजण सुरक्षित आहेत.

कोण आहेत हेमंत गोडसे ?

नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. याआधी २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचा पराभव केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number