महाराष्ट्र एनसीसीची हॅटट्रिक

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान ध्वज’ आणि ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आले. ‘महाराष्ट्र एनसीसी‘ला सलग तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला. या कामगिरीसाठी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले. भारतात एनसीसीची […]

महाराष्ट्र एनसीसीची हॅटट्रिक

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान ध्वज’ आणि ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आले. ‘महाराष्ट्र एनसीसी‘ला सलग तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला. या कामगिरीसाठी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

भारतात एनसीसीची सतरा संचालनालये आहेत. या सर्व संचालनालयांमधील निवडक छात्रसैनिकांचे प्रजासत्ताक दिन शिबीर दिल्लीत होते. या शिबिराचा समारोप वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या आणि एकूणच शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये चांगले कार्य केलेल्या संचालनालयाला मानाचा ध्वज आणि चषक प्रदान सोहळ्याद्वारे होतो. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये महाराष्ट्र संचालनालयाला ध्वज आणि चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संचालनालयाने या आधी अठरा वेळा हा ध्वज पटकावला. महाराष्ट्र एनसीसीने २००२ ते २०१३ दरम्यान सलग बारा वेळा ‘पंतप्रधान ध्वज’ पटकावला. राज्याचे एनसीसी संचालनालय २०२० आणि २०२१ मध्ये उपविजेते ठरले तर २०२२, २०२३, २०२४ असे सलग तीन वेळा पंतप्रधान ध्वजाचे मानकरी झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number