Homeताज्या बातम्यामहाराष्ट्राला पुन्हा मिळाला सर्वोत्कृष्ट छात्र सैनिकाचा मान
महाराष्ट्राला पुन्हा मिळाला सर्वोत्कृष्ट छात्र सैनिकाचा मान
नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पंतप्रधान रॅली पार पडली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छात्र सैनिकांना पदके आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. रॅलीत छात्र सैनिकांनी पंतप्रधान मोदी यांना सलामी दिली. यंदाच्या एनसीसी पंतप्रधान रॅलीमध्ये २४ परदेशी छात्र सैनिक सहभागी झाले होते. यंदाच्या वार्षिक एनसीसी पंतप्रधान रॅलीत […]
नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पंतप्रधान रॅली पार पडली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छात्र सैनिकांना पदके आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. रॅलीत छात्र सैनिकांनी पंतप्रधान मोदी यांना सलामी दिली. यंदाच्या एनसीसी पंतप्रधान रॅलीमध्ये २४ परदेशी छात्र सैनिक सहभागी झाले होते. यंदाच्या वार्षिक एनसीसी पंतप्रधान रॅलीत महाराष्ट्राला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट छात्र सैनिकाचा मान मिळाला.