नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. पार्वती बरुआ, उदय देशपांडे, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सोमण्णा, सर्वेश्वर, सांगथाम यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे
देशातील पहिली महिला माहुत पार्वती बरुआ
समाजसेवक जागेश्वर यादव, छत्तीसगड
समाजसेवक चामी मुर्मू, झारखंड
समाजसेवक गुरविंदर सिंह, हरियाणा
कृषीतज्ज्ञ सत्यनारायण बलेरी, केरळ
समाजसेवक दुक्खू माझी, पश्चिम बंगाल