नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : देशातील ३१ जणांना राष्ट्रपती जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील तीन पराक्रमी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक आणि २१ पराक्रमींना जीवन रक्षा पदक जाहीर झाली आहेत. जीवन रक्षा पदकासाठी राज्यातून आदिका राजाराम पाटील, प्रियांका भारत काळे आणि सोनाली सुनीन बालोडे या तीन महिलांची निवड झाली.