अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रामाची प्राणप्रतिष्ठा दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलीस, उत्तर प्रदेश पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक, राखीव पोलीस, केंद्रीय सुरक्षा पथके अयोध्येत बंदोबस्तासाठी नियुक्त आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने अयोध्येची हवाई पाहणी केली जात आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करून घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा पास, आमंत्रण पत्रिका यापैकी काहीही नसले तर मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.