‘त्या’ लाडवांना जीआय टॅग

अयोध्या, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तर प्रदेश येथील हनुमान गढी येथे हनुमानाचे दर्शन घेतलेल्यांना देशी तुपापासून तयार केलेले लाडू प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर लाडू निर्मिती केली जाते. हनुमान गढी येथेच देशी तुपापासून तयार केलेल्या लाडवांना जीआय टॅग देण्याची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हनुमान गढीच्या देशी तुपापासून तयार केलेल्या […]

‘त्या’ लाडवांना जीआय टॅग

अयोध्या, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तर प्रदेश येथील हनुमान गढी येथे हनुमानाचे दर्शन घेतलेल्यांना देशी तुपापासून तयार केलेले लाडू प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर लाडू निर्मिती केली जाते. हनुमान गढी येथेच देशी तुपापासून तयार केलेल्या लाडवांना जीआय टॅग देण्याची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हनुमान गढीच्या देशी तुपापासून तयार केलेल्या लाडूला जीआय टॅग दिला जाईल. ही माहिती मिळाल्यापासून अयोध्येतील मिठाई विक्रेत्यांचा उत्साह वाढला आहे.

जीआय टॅग म्हणजे काय ?

एखाद्या पदार्थाचा दर्जा, स्थान, पत आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये असणारी त्या पदार्थाची विशेष ओळख जपण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थाच्या प्रमाणीकरणासाठी दिला जाणारा दर्जा म्हणजे भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग. पदार्थाला देण्यात आलेला दर्जा किंवा चिन्ह त्या भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतो म्हणून जीआय टॅग महत्त्वाचा असतो. जालन्याची दगडी ज्वारी, कुंथलगिरीचा खवा, तुळजापूरची कवडी, पानचिंचोली चिंच, बोरसुरी डाळ, कास्तीची कोथिंबीर या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सहा पदार्थांना अलिकडेच जीआय टॅग मिळाला आहे. जीआय टॅग हा दहा वर्षांसाठी असतो. हा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number