महाराष्ट्राच्या सागवान लाकडाने बनले अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे

अयोध्या, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: २२ जानेवारीला राम मंदिरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी युद्ध स्थरावर सुरू आहे. राम मंदिराचे बांधकामदेखील अतिशय वेगाने सुरू आहे. मंदिरात लागणाऱ्या दरवाज्यांबद्दल माहिती समोर आली आहे. राम मंदिरात बसवण्यात येणाऱ्या दरवाजाची उंची ९ फूट तर लांबी १२ फूट इतकी आहे. हे दरवाजे महाराष्टा्राच्या गडचिरोली […]

महाराष्ट्राच्या सागवान लाकडाने बनले अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे

अयोध्या, ०७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: २२ जानेवारीला राम मंदिरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी युद्ध स्थरावर सुरू आहे. राम मंदिराचे बांधकामदेखील अतिशय वेगाने सुरू आहे. मंदिरात लागणाऱ्या दरवाज्यांबद्दल माहिती समोर आली आहे. राम मंदिरात बसवण्यात येणाऱ्या दरवाजाची उंची ९ फूट तर लांबी १२ फूट इतकी आहे. हे दरवाजे महाराष्टा्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातले आहे. गडचीरोली जिल्ह्यातील सागवान संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध आहे. अस्सल सागवानाचे दरवाजे अयोध्येत तयार होत आहेत. या दरवाज्यांमध्ये मुख्य दरवाजाचा देखील समावेश आहे.

मंदिराच्या दारांवर अतिशय आकर्षक असं नक्षीकाम करण्यात येत आहे. अनुराधा इंटरनेशनल टिम्बर कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. कुशल व अनुभवी कारागिरांनी नगर शैलीत कोरीव नक्षीकाम केलं आहे. या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. या शिवाय मंदिर प्रशासनाकडून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची जेवणाची विशेष व्यावस्था केली गेली आहे. कुठलाच भाविक हा उपाशापोटी परत जावू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कारसेवकपूरम मध्ये भाविकांच्या जेवणाची व्यावस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रसासनाकडून तब्बल २० लाख पत्रावळी तयार करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number