वाहन अपघातात सहा तरुणांचा मृत्यू

जमशेदपूर, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडच्या जमशेदपूरमध्ये झालेल्या वाहन अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. बिष्टूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस परिसरात हा अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे वाहन आधी दुभाजकाला धडकले नंतर झाडावर आपटले. अपघातात ज्या तरुणांचा मृत्यू झाला ते सर्वजण नववर्षाच्या पार्टीतून परतत होते. सर्व तरुण नशेत […]

वाहन अपघातात सहा तरुणांचा मृत्यू

जमशेदपूर, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडच्या जमशेदपूरमध्ये झालेल्या वाहन अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. बिष्टूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस परिसरात हा अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे वाहन आधी दुभाजकाला धडकले नंतर झाडावर आपटले. अपघातात ज्या तरुणांचा मृत्यू झाला ते सर्वजण नववर्षाच्या पार्टीतून परतत होते. सर्व तरुण नशेत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. वाहनात आठ तरुण होते. या आठजणांपैकी सहा तरुणांचा मृत्यू झाला तर दोन जण वाचले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number