नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आसाम सरकार, केंद्र सरकार आणि उल्फा या दहशतवादी संघटनेत शांतता करारावर स्वाक्षरी झाली. करारानुसार उल्फाच्या दहशतवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि हिंसा थांबवली आहे. या करारामुळे ईशान्य भारतात शांतता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम, आसाम सरकार आणि भारत सरकार यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाली. या प्रसंगी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पण उपस्थित होते. अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वातील उल्फाच्या गटाने शांतता करार केला आहे पण परेश बरुआच्या नेतृत्वातील उल्फाच्या गटाने शांतता करारावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही.