नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी घुसखोरी झाली. या घुसखोरीची गंभीर दखल घेऊन संसदेच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे अर्थात सीआयएसएफकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. सीआयएसएफकडे देशातील अनेक अणुभट्ट्या, विमानतळ, दिल्ली मेट्रो, केंद्र सरकारच्या अखत्यारितील निवडक इमारती यांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सीआयएसएफला संसदेची संरक्षणाच्यादृष्टीने पाहणी […]
नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी घुसखोरी झाली. या घुसखोरीची गंभीर दखल घेऊन संसदेच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे अर्थात सीआयएसएफकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. सीआयएसएफकडे देशातील अनेक अणुभट्ट्या, विमानतळ, दिल्ली मेट्रो, केंद्र सरकारच्या अखत्यारितील निवडक इमारती यांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सीआयएसएफला संसदेची संरक्षणाच्यादृष्टीने पाहणी करून सुरक्षा कडे तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.