नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातील सर्व महामार्ग २०२४ च्या अखेरपर्यंत टोलनाकेमुक्त होणार, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भारतातील सर्व वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली जाईल. सर्व वाहनांना फास्टॅग स्टिकर अनिवार्य केला जाईल. यामुळे टोलनाक्यावर न थांबता डिजिटल पद्धतीने टोल भरून वाहने वेगाने पुढील प्रवासाला निघू शकतील; असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. महामार्ग टोलनाकेमुक्त झाल्यामुळे वाहतुकीच्या वेगात वाढ होील आणि वेळ तसेच इंधनाची बचत होईल, असे गडकरी म्हणाले.