लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सोमवारी १८ डिसेंबर रोजी कामकाजाची सुरुवात होताच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला. संसदेत झालेल्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी चर्चेची मागणी केली. तर घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत […]

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सोमवारी १८ डिसेंबर रोजी कामकाजाची सुरुवात होताच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला. संसदेत झालेल्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी चर्चेची मागणी केली. तर घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत असून तपास सुरू असताना जाहीर चर्चा करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. सरकारच्या भूमिकेला विरोध करत विरोधकांनी गोंधळ घातला. अखेर लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. याआधी मागच्या आठवड्यात शुक्रवारी संसदेतील घुसखोरीच्या मुद्यावर बोलताना काही खासदारांनी गोंधळ घातला. संसदीय कामकाजाच्या शिस्तीचे उल्लंघन केले. अखेर बहुमताने राज्यसभेतून तृणमलू काँग्रेस पक्षाच्या डेरेक ओ’ब्रायन या खासदाराचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. तसेच लोकसभेतून १३ खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

लोकसभेतून निलंबित झालेले खासदार : बेनी बेहानन, व्हीके श्रीकंदन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी करुणानिधी, के सुब्रह्मण्यम, एस वेंकटेशन, मणिकम टागोर

लोकसभेतून निलंबित झालेले काँग्रेसचे खासदार : टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस

तृणमूल काँग्रेसचे निलंबित झालेले राज्यसभा खासदार : डेरेक ओ ब्रायन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number