संसद घुसखोरी, ललितला पोलीस कोठडी

नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसद घुसखोरी प्रकरणी ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ललित गुरुवारी दिल्ली पोलिसांना शरण आला. यानंतर दिल्ली पोलिसांनी ललितला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ललितला १५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ललितला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली. याआधी गुरुवारी न्यायालयाने संसद घुसखोरी […]

संसद घुसखोरी, ललितला पोलीस कोठडी

नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसद घुसखोरी प्रकरणी ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ललित गुरुवारी दिल्ली पोलिसांना शरण आला. यानंतर दिल्ली पोलिसांनी ललितला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ललितला १५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ललितला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली. याआधी गुरुवारी न्यायालयाने संसद घुसखोरी प्रकरणी सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल या चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.

कोण आहे ललित झा ?

हारचा ललित इन्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःची ओळख शिक्षक अशी करून देतो. तो एका स्वयंसेवी संस्थेचा सरचिटणीस असल्याचे काहीजण सांगतात. त्याच्या इन्स्टा पोस्ट हिंसेला चिथावणी देणाऱ्या आहेत. नीलम आणि अमोल संसद परिसरात हुल्लडबाजी करत असताना या हुल्लडबाजीचे चित्रिकरण करण्याचे काम ललित करत होता. सुरक्षा पथकांनी धरपकड सुरू करताच ललित फरार झाला होता. पळून जाताना ललित पटकन सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल या चौघांचे मोबाईल घेऊन गेला होता. पण शरण आला त्यावेळी ललितकडे एकही मोबाईल नव्हता. त्याने सर्व मोबाईल नष्ट केले आणि नंतर पोलिसांना शरण आला. दिल्लीतून फरार झालेला ललित आधी कुचमन येथे गेला होता, जिथे तो त्याचा मित्र महेशला भेटला. महेशनेच ललितला रात्र घालवण्यासाठी खोली मिळवून दिली.

बुधवारी संसद भवनात घडलेल्या घटनेनंतर ललितने सर्व मोबाईल नष्ट केले होते. पण पोलिसांचा ललितच्या बोलण्यावर विश्वास नाही. यामुळे ललितने दिलेल्या माहितीची सखोल तपासणी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number