‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलेच’

नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलेच आहे, या भागासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत २४ जागांची तरतूद आहे. ही घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. ते बुधवारी लोकसभेत ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ आणि ‘जम्मू काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयका’वर बोलत होते. ज्या लोकांवर गेल्या ७० वर्षांपासून अन्याय झाला, अपमान झाला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष […]

‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलेच’

नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलेच आहे, या भागासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत २४ जागांची तरतूद आहे. ही घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. ते बुधवारी लोकसभेत ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ आणि ‘जम्मू काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयका’वर बोलत होते. ज्या लोकांवर गेल्या ७० वर्षांपासून अन्याय झाला, अपमान झाला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यांना हे विधेयक न्याय देईल; असेही अमित शाह म्हणाले.

जम्मू-काश्मीर विधानसभेत १०७ जागा आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर त्यांची संख्या ११४ झाली आहे. पाकिस्तानव्याप्तमधून आलेल्या विस्थापितांना प्रतिनिधित्व देण्यासाठी विधानसभेत एक जागा राखीव आहे. जम्मू-काश्मीरमधून विस्थापीत झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव आहेत. या तीन राखीव जागांपैकी एका जागेवर महिला प्रतिनिधी असेल. जम्मूत आधी ३७ जागा होत्या आता ४३ असतील. काश्मीरमध्ये आधी ४६ जागा होत्या आता ४७ असतील. पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलेच आहे, या भागासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत २४ जागांची तरतूद आहे. राज्यात आधी दोन नामनिर्देशित सदस्य होते आता त्यांची संख्या ५ इतकी करण्यात आली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून ४६ हजार ६३१ कुटुंबे आणि १ लाख ५७ हजार ९६७ लोकं विस्थापित झाले. या विधेयकातून त्यांना अधिकार आणि प्रतिनिधित्व मिळणार आहे, असे अमित शाह म्हणाले.

जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणि जम्मू काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक लोकसभेत संमत
कलम ३७० हटवल्याने काहींना पोटदुखी – अमित शाह

अमित शाहंनी सांगितल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या दोन गंभीर चुका

भारतीय सैन्य जिंकत असताना जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी करणे
जम्मू काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांकडे नेणे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number