मुंबई , २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने नुकतेच आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्न केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो बराच चर्चेत आहे. अशातच, आता लग्नानंतर रणदीप पत्नीसोबत पुन्हा मुंबईत परतला आहे. नुकतेच या नवं विवाहित जोडप्ल्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.
अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लॅशराम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रणदीप हुड्डाने पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि शर्ट परिधान केला होता. तर लिन लॅशरामने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या नवविवाहित जोडप्याच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केलाय.