कॅलिफोर्निया, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जी मेलची वापरात नसलेली पर्सनल ई – मेल अकाउंट डीलीट होणार आहेत. ही प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने जुनी वापरात नसलेली अर्थात इनअॅक्टिव्ह ई – मेल अकाउंट डीलीट होणार आहेत. डीलीट होणार असलेल्या अकाउंटच्या वापरकर्त्यांना मागील काही दिवसांत अकाउंटशी संलग्न पर्यायी ई – मेल अकाउंटवर तसेच संलग्न मोबाईल क्रमांकावर नोटिफिकेशन्स अर्थात सूचना येत आहेत. दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून वापरात नसलेली जी मेल अकाउंट आधी डीलीट होणार आहेत.