अभिनेता सलमान खानला गुंड लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता सलमान खान नेहमी त्याच्या खासगी तसेच व्यावसायिक कामांमुळेही अनेकदा चर्चेत असतो. सध्या सलमानचा टायगर ३ सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून आलेल्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी कॅनडातील […]

अभिनेता सलमान खानला गुंड लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता सलमान खान नेहमी त्याच्या खासगी तसेच व्यावसायिक कामांमुळेही अनेकदा चर्चेत असतो. सध्या सलमानचा टायगर ३ सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून आलेल्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत.

काही दिवसांपूर्वी कॅनडातील गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे गिप्पी ग्रेवालची सलमान खानसोबतची जवळीक असल्याचं लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं होतं. आता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मंगळवारी (२८ नोव्हेंबर) मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पोलिसांनी सलमानलाही सावध राहण्याचं सांगितलं आहे. सध्या सलमान खानला वाय प्लस सुरक्षा आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून लिहिलेल्या पोस्टमध्ये, “तू सलमान खानला तुझा भाऊ मानतोस, पण आता त्याच तुझ्या भावाने तुला येऊन वाचवण्याची वेळ आली आहे. हा मेसेज तुझ्यासोबत सलमान खानसाठीही आहे. दाऊद तुला वाचवेल, या भ्रमात राहू नको. तुला कोणीही वाचवू शकणार नाही.”

महत्त्वाचे मुद्दे –

सलमान खानला पुन्हा धमकी
मुंबई पोलिसांकडून होणार सुरक्षेची तपासणी
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number