मुंबई : अभिनेता रणबीर कपूरची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. सध्या तो त्याच्या आगामी अॅनिमल या चित्रपटामुळे बराच चर्चेत असतो. रणबीरच्या चाहत्यांसह सर्वांनाच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार यांची उत्सुकता लागून आहे. अशातच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला पण यात विशेष बाब म्हणजे अॅनिमलला एक खास सन्मान मिळालाय. तो म्हणजे अॅनिमलचा ट्रेलर थेट बुर्ज खलिफावर झळकवण्यात आलाय.
अॅनिमलचा खास ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. या वेळच एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड चाराल होत आहे. या व्हिडिओत अभिनेता रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि भूषण कुमारही दिसत आहेत.