भोपाळ, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशात शुक्रवारी एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान आहे तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या मतदान आहे. मतमोजणी तीन डिसेंबर रोजी आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक
एका टप्प्यात मतदान
शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान
रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी
एकूण जागा २३०
छत्तीसगड विधानसभा निवडणूक
दोन टप्प्यात मतदान
मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान
शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी
एकूण जागा ९०