अभिनेत्री राजश्रीनं दिली गोड बातमी

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘सुहानी सी एक लडकी’ आणि ‘इमली’ यांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजश्री राणी हिने गोड बातमी दिली आहे.राजश्री राणीच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्री राजश्रीने इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेयर करत लवकरच ती आई होणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री राजश्री […]

अभिनेत्री राजश्रीनं दिली गोड बातमी

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘सुहानी सी एक लडकी’ आणि ‘इमली’ यांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजश्री राणी हिने गोड बातमी दिली आहे.राजश्री राणीच्या घरी लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्री राजश्रीने इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेयर करत लवकरच ती आई होणार असल्याची घोषणा केली आहे.

अभिनेत्री राजश्री हिने २०२० मध्ये टीव्ही अभिनेता गौरव मुकेश जैनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता हे जोडपं आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खुप उत्सुक आहेत. राजश्रीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत तिचा आनंदही शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिचा बेबी बम्प दाखवताना दिसत आहे. तिचे हे फोटो काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकरी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number