जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांची मालमत्ता जप्त

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : स्टेट बँक ऑफ इंडियाप्रणीत देशातील काही प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी १ सप्टेंबरपासून अटकेत असलेले जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत त्यांची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये गोयल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांच्या नावे असलेले १७ फ्लॅट्स, […]

जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांची मालमत्ता जप्त

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : स्टेट बँक ऑफ इंडियाप्रणीत देशातील काही प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी १ सप्टेंबरपासून अटकेत असलेले जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत त्यांची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये गोयल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांच्या नावे असलेले १७ फ्लॅट्स, बंगले, व्यावसायिक कार्यालये तसेच विविध राज्यांत असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी गोयल यांचे निवासस्थान व कार्यालय तसेच त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयावरही छापेमारी केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number