श्रीनगर, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधी गटात धुसफूस सुरू आहे. काहीही आलबेल नाही, अशी कबुली नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांनी दिली. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे तिथल्या जागा वाटपावरून मतभेद आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील मतभेद वाढले आहेत. निवडणुकांनंतर काय परिस्थिती असेल यावरून मोदी विरोधी आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.