गाझा सीमेवर इस्रायलचे शेकडो रणगाडे सज्ज

गाझा पट्टी, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हमास या दहशतवादी संघटनेचा समूल नायनाट करण्यासाठी इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला लक्ष्य करून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. हे हल्ले सुरू असतानाच इस्रायलने गाझा सीमेवर शेकडो रणगाडे सज्ज ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी हे रणगाडे गाझा पट्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हमासचे गाझा पट्टीतील सर्व तळ […]

गाझा सीमेवर इस्रायलचे शेकडो रणगाडे सज्ज

गाझा पट्टी, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हमास या दहशतवादी संघटनेचा समूल नायनाट करण्यासाठी इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला लक्ष्य करून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. हे हल्ले सुरू असतानाच इस्रायलने गाझा सीमेवर शेकडो रणगाडे सज्ज ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी हे रणगाडे गाझा पट्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

हमासचे गाझा पट्टीतील सर्व तळ आणि लपण्याची ठिकाणे नष्ट करण्यासाठी इस्रायलने हवाई मार्गाने तसेच जमिनीवरून हल्ले करण्याचा निर्णय घेतला आहे. गाझा पट्टीत हमासने जमिनीखाली बोगद्यांचे जाळे आणि गोदामांचे बांधकाम केले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी इस्रायलने जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी केली आहे.

गाझा सीमेवर रणगाडे सज्ज होताच लेबेनॉनमधून इस्रायलवर हवाई हल्ले झाले. लेबेनॉनमधून आलेल्या रॉकेटपैकी अनेक रॉकेट इस्रायलने हवेत नष्ट केली. पण काही रॉकेटमुळे इस्रायलमध्ये हानी झाल्याचे वृत्त आहे. हे हल्ले झाले तरी इस्रायलच्या गाझा सीमेवरील तयारीचा वेग कमी झालेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number