प्रयागराज, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुरेंद्र कोळी आणि मनिंदर पंढेरची निर्दोष मुक्तता केली. दोघांची फाशी रद्द करण्यात आली. सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून फाशी ठोठावली होती.
सत्र न्यायालयाने सुरेंद्र कोळीला बारा तर मनिंदर पंढेरला दोन खटल्यांमध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण उच्च न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावी सुरेंद्र कोळी आणि मनिंदर पंढेरची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती सय्यद आफताब हुसेन रिझवी यांनी हा निर्णय दिला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने काही काळ निर्णय राखून ठेवला होता.
काय आहे निठारी हत्याकांड ?
उत्तर प्रदेशमध्ये नोएडाजवळ निठारी आहे. या निठारीत २००५ ते २००६ या काळात एका घराच्या आवारातून तसेच घराजवळच्या नाल्यातून अनेक मुलींचे सांगाडे आढळले होते. या प्रकरणात घराचा मालक मनिंदर पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी या दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले. सुरेंद्र कोळी विरोधात सोळा प्रकरणांमध्ये हत्या, अपहरण, बलात्कार, पुरावे नष्ट करणे असे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले. तर मनिंदर पंढेर विरोधात मानवी अवयवांच्या तस्करीचे गुन्हे दाखल झाले होते.
मनिंदर पंढेर – वकील – मनिषा भंडारी
सुरेंद्र कोळी – वकील – पयोशी रॉय