भारताचा कॅनडाला आणखी एक दणका

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने कॅनडाला आणखी एक दणका दिला आहे. दिल्लीतल्या दूतावासातील कर्मचारी संख्या १० ऑक्टोबरपर्यंत कमी करा, असा आदेश मोदी सरकारने दिला आहे. सध्या कॅनडाच्या दिल्लीतल्या दूतावासात ६२ अधिकारी कार्यरत आहेत. ही कर्मचारी संख्या ४१ ने कमी करा. ज्या अधिकाऱ्यांना माघारी बोलावणार आहात त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत मायदेशी न्या, असा आदेश […]

भारताचा कॅनडाला आणखी एक दणका

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने कॅनडाला आणखी एक दणका दिला आहे. दिल्लीतल्या दूतावासातील कर्मचारी संख्या १० ऑक्टोबरपर्यंत कमी करा, असा आदेश मोदी सरकारने दिला आहे.

सध्या कॅनडाच्या दिल्लीतल्या दूतावासात ६२ अधिकारी कार्यरत आहेत. ही कर्मचारी संख्या ४१ ने कमी करा. ज्या अधिकाऱ्यांना माघारी बोलावणार आहात त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत मायदेशी न्या, असा आदेश भारत सरकारने दिला आहे. या आदेशाचे पालन केल्यानंतर कॅनडाच्या दिल्लीतल्या दूतावासातील कर्मचारी संख्या २१ होणार आहे. ‘ज्या अधिकाऱ्यांना मायदेशी नेणार त्यांची यादी जाहीर करा. या अधिकाऱ्यांना मुदत संपल्यानंतर भारतात आढळल्यास विशेषाधिकारांचा आणि राजकीय संरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’, असे भारत सरकारने जाहीर केले आहे. याआधी भारताने कॅनडाला पाच मोठे दणके दिले होते.

कॅनडाला भारताने दिले पाच दणके

१. कॅनडाचा आरोप भारताने अधिकृतरित्या फेटाळला
२. भारतातील कॅनडाच्या दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेश
३. खलिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांपासून धोका असल्यामुळे भारतीयांनी कॅनडात जाणे टाळावे, कॅनडात जाणे आवश्यक असल्यास स्वतःची काळजी घ्यावी आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे; असा खबरदारीचा इशारा भारताने प्रसिद्ध केला
४. कॅनडात असलेल्या ४३ खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध
५. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यावर बंदी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य

१. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान
२. कॅनडात असलेल्या भारतीयांचे संरक्षण करणे ही कॅनडा सरकारची जबाबदारी

कॅनडाची पंचाईत

१. जी २० गटातील एकाही देशाने भारतविरोधी आरोपांच्या प्रकरणात कॅनडाचे समर्थन केलेले नाही
२. खलिस्तानी दहशतवाद्यांना आमच्या देशात थारा देणार नाही, इंग्लंडने जाहीर केली अधिकृत भूमिका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number