कडक्कल, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तिच्या समर्थकांकडून भारतीय लष्कराच्या जवानावर हल्ला झाल्याचे समजते. केरळ राज्यातील कडक्कल जिल्ह्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी लवकरच हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जाण्याची शक्यता आहे.
जवानाच्या पाठीवर लिहिले
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित सहाजणांनी जवानावर हल्ला केला. हल्लेखोरांनी जवानाच्या पाठीवर पीएफआय असे लिहिले.