गुरपतवंत सिंग पन्नूच्या भारतातील मालमत्तेची जप्ती

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अटक टाळण्यासाठी कॅनडात आश्रय घेतलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूची भारतातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्तीच्या कारवाया पंजाबमधील जालंधर आणि चंदिगडमध्ये करण्यात आल्या. अज्ञात हल्ल्यात ठार झालेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक […]

गुरपतवंत सिंग पन्नूच्या भारतातील मालमत्तेची जप्ती

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अटक टाळण्यासाठी कॅनडात आश्रय घेतलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूची भारतातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्तीच्या कारवाया पंजाबमधील जालंधर आणि चंदिगडमध्ये करण्यात आल्या. अज्ञात हल्ल्यात ठार झालेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत पन्नू आणि निज्जरच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. राष्ट्रीय तपास संस्थेने ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या दहा दहशतवाद्यांवर प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या दहशतवाद्यांबाबत अचूक माहिती देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल असे राष्ट्रीय तपास संस्थेने जाहीर केले आहे. याआधी गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेने कॅनडात लपलेल्या ४३ खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली.

कॅनडात एका हल्ल्यात निज्जर ठार झाला. या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला. हा आरोप केला तरी जस्टिन ट्रूडो यांनी पुरावा दिला नाही. यानंतर भारत सरकारने जस्टिन ट्रूडो यांचे आरोप फेटाळले आणि कॅनडा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मागील अनेक वर्षांपासून कॅनडा हे खलिस्तानी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झाले असल्याचे भारत सरकारने सांगितले.

कॅनडाला भारताने दिले पाच दणके

१. कॅनडाचा आरोप भारताने अधिकृतरित्या फेटाळला
२. भारतातील कॅनडाच्या दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेश
३. खलिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांपासून धोका असल्यामुळे भारतीयांनी कॅनडात जाणे टाळावे, कॅनडात जाणे आवश्यक असल्यास स्वतःची काळजी घ्यावी आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे; असा खबरदारीचा इशारा भारताने प्रसिद्ध केला
४. कॅनडात असलेल्या ४३ खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध
५. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यावर बंदी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number