कॅनडाला भारताचे पाच दणके

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर जून २०२३ मध्ये कॅनडात ठार झाला. पण निज्जरवर झालेल्या गोळीबारात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये केला. आरोप केल्यानंतर ट्रूडो यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. यानंतर कॅनडाने भारतासोबत मुक्त व्यापार कराराची चर्चा एकतर्फी स्थगित केली. भारताच्या कॅनडातील […]

कॅनडाला भारताचे पाच दणके

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर जून २०२३ मध्ये कॅनडात ठार झाला. पण निज्जरवर झालेल्या गोळीबारात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये केला. आरोप केल्यानंतर ट्रूडो यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. यानंतर कॅनडाने भारतासोबत मुक्त व्यापार कराराची चर्चा एकतर्फी स्थगित केली. भारताच्या कॅनडातील दूतावासातील एका अधिकाऱ्याला ट्रूडो सरकारने देश सोडण्याचा आदेश दिला. यानंतर कॅनडाने भारतात जम्मू काश्मीरमध्ये जाऊ नका, अशा खबरदारीचा इशारा कॅनडाच्या नागरिकांना दिला. यानंतर भारताने कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले.

कॅनडाला भारताने दिले पाच दणके

१. कॅनडाचा आरोप भारताने अधिकृतरित्या फेटाळला
२. भारतातील कॅनडाच्या दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेश
३. खलिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांपासून धोका असल्यामुळे भारतीयांनी कॅनडात जाणे टाळावे, कॅनडात जाणे आवश्यक असल्यास स्वतःची काळजी घ्यावी आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे; असा खबरदारीचा इशारा भारताने प्रसिद्ध केला
४. कॅनडात असलेल्या ४३ खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध
५. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्यावर बंदी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य

१. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान
२. कॅनडात असलेल्या भारतीयांचे संरक्षण करणे ही कॅनडा सरकारची जबाबदारी

कॅनडाची पंचाईत

१. जी २० गटातील एकाही देशाने भारतविरोधी आरोपांच्या प्रकरणात कॅनडाचे समर्थन केलेले नाही
२. खलिस्तानी दहशतवाद्यांना आमच्या देशात थारा देणार नाही, इंग्लंडने जाहीर केली अधिकृत भूमिका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number