काँग्रेसचा महिला आरक्षणाला पाठिंबा – सोनिया गांधी

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेला सुरुवात झाली. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. काँग्रेसकडून सोनिया गांधीनी या चर्चेची सुरुवात केली. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत नारीशक्ती वंदना कायद्याला सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आहे. परंतु आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करण्यात यावी याची मागणी त्यांनी […]

काँग्रेसचा महिला आरक्षणाला पाठिंबा – सोनिया गांधी

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेला सुरुवात झाली. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. काँग्रेसकडून सोनिया गांधीनी या चर्चेची सुरुवात केली. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत नारीशक्ती वंदना कायद्याला सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आहे. परंतु आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करण्यात यावी याची मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सोनिया गांधींनी प्रत्यक्ष चर्चेत फारसा सहभाग घेतला नाही. त्या लोकसभेत उपस्थित असल्या तरी काँग्रेसची बाजू मांडण्याची जबाबदारी अन्य खासदारांवर असते. महिला आरक्षण विधेयकासाठी मात्र सोनिया गांधींनी अपवाद केल्याचं दिसलं. भारतीय स्त्री अत्यंत सक्षम असून महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्यचे सोनिया गांधी म्हणाल्या. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करा नाहीतर एससी आणि एसटींची संख्या कशी कळणार? तसेच लवकरात लवकर आरक्षण लागू करावे असे देखील सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाले भाजपा खासदार निशिकांत दुबे?

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, काँग्रेसने महिला आरक्षणाचे लॉलिपॉप केले. महिला आरक्षण विधेयकामुळे काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. सोनिया गांधी आता श्रेय घेत आहेत. कॉंग्रेसने चुकीचे विधेयक आणले होते. त्यामुळे सोनिया गांधींनी राजकारण करू नये. महिला आरक्षण विधेयक हे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे यश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number