‘आदित्य एल-१’चा महत्त्वाचा टप्पा पार !

भारताच्या ‘आदित्य एल-१’ मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाने पृथ्वीची कक्षा सोडली असून, आता त्याचा एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजता या मोहिमेतील ट्रान्स लॅग्रेंजिअल पॉइंट-१ इन्सर्शन मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आता आदित्य उपग्रह हा एल-१ लँग्रेंज […]

‘आदित्य एल-१’चा महत्त्वाचा टप्पा पार !

भारताच्या ‘आदित्य एल-१’ मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाने पृथ्वीची कक्षा सोडली असून, आता त्याचा एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजता या मोहिमेतील ट्रान्स लॅग्रेंजिअल पॉइंट-१ इन्सर्शन मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं.

इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आता आदित्य उपग्रह हा एल-१ लँग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास करत आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या पॉइंटवर पोहोचण्यासाठी आदित्यला इथून पुढं ११० दिवसांचा वेळ लागेल.

११० दिवसांनंतर जेव्हा आदित्य उपग्रह एल-१ पॉइंटजवळ पोहोचेल, तेव्हा आणखी एक मॅन्यूव्हर पार पाडण्यात येईल. या प्रक्रियेने आदित्यला या लॅग्रेंज पॉइंटच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. या ठिकाणाहून हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number