नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. घरोघरी आज बाप्पाचं आगमन होत आहे. गणरायाचं स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही ट्विटर पोस्टच्या माध्यमातून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी मराठीतून पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील आपला फोटो पोस्ट केला आहे.