मुंबई ,२३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: सध्या संपूर्ण भारतासह जागाच लक्ष लागून राहिले आहे ते चांद्रयान – ३ कडे. काही क्षणातच चांद्रयान- ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्ड होणार आहे. काही वेळेपूर्वीच इसरोने काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले आहेत. चांद्रयान – ३ चे इसरोच्या यूट्यूब चॅनल वरून नागरिकांना थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
जगातल्या सर्व महत्वाच्या यंत्रणेची चांद्रयान मोहिमेवर बारीक नजर आहे. चांद्रयान – ३ चंद्राच्या जवळ पोहचताच समाज माध्यमांवर अनेक मिम्स प्रसारित झाले आहेत. त्यातील हे एक मजेशीर मिम वेगात पसरत आहे. यात पृथ्वी चंद्राला राखी बांधताना दिसत आहे.