भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटबंदीचा घेतलेल्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, या निर्णयाचा सकारात्मक तसेच नकारात्मक परिणामही होताना दिसून येत आहे. दरम्यान, दोन हजराच्या नोटबंदीचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा जळगावच्या सुवर्ण नगरीवरसुद्धा परिणाम झाला आहे.
भविष्यात नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलविण्याचा त्रास वाचवण्यासाठी नागरिक त्या दोन हजारांच्या नोटांचा सोन्यामध्ये खरेदी करून गुंतवणूक करतील. त्यामुळे या निर्णयाचा साहजिकच सराफ बाजारावर सुद्धा परिणाम होणार आहे. दोन हजारांची नोटा बदलाव्या साठी लोकांचा सोने खरेदीवर वळतील, त्यामुळे परिणामी सोन्याचे भाव वाढतील,असं मत सराफ व्यवसायिकांनी बोलताना व्यक्त केलं आहे. थोडासा त्रास होईल मात्र शासनाचा हा निर्णय निश्चितच चांगला असून यामुळे काळा पैसा बाहेर पडेल असेही सराफ व्यावसायिकांनी बोलताना सांगितलं.