‘मोदी-शाहांना मतदारांनी झिडकारलं’

कर्नाटकातील विधानसभा निवणुकीचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटक निकालाचे लोक जाहीर होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत मोदी शाहांवर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर संजय राऊत म्हणाले, कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते […]

‘मोदी-शाहांना मतदारांनी झिडकारलं’

कर्नाटकातील विधानसभा निवणुकीचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटक निकालाचे लोक जाहीर होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत मोदी शाहांवर जोरदार निशाणा साधला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर संजय राऊत म्हणाले,
कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे.

देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली, असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number