‘रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच’

लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणारे नाही. रिफायनरीचं समर्थन करून दाखवाच, उद्धव ठाकरे यांनी राजकर्त्यांना आव्हान दिल आहे. उद्धव ठाकरे शनिवारी बरसू दौऱ्यावर आहेत. राजापूरमध्ये पोहचल्यानंतर उद्धव यांनी सोलगावात रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. यावेळी स्थानिकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सोलगावातील नागरिकांनी यावेळी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी देखील केली. उद्धव […]

‘रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच’

लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणारे नाही. रिफायनरीचं समर्थन करून दाखवाच, उद्धव ठाकरे यांनी राजकर्त्यांना आव्हान दिल आहे. उद्धव ठाकरे शनिवारी बरसू दौऱ्यावर आहेत. राजापूरमध्ये पोहचल्यानंतर उद्धव यांनी सोलगावात रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. यावेळी स्थानिकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सोलगावातील नागरिकांनी यावेळी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी देखील केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की,
“रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आहे. मात्र मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू.” तसंच “मन की बात करायला आलो नाही, जन की बात ऐकायला आलोय,” असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव यांनी कातळशिल्पांची माहिती देत सांगितले की,
या कातळशिल्पाची जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी यासाठी पत्र लिहिलं होतं. परंतु या कातळशिल्पांची जागा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात जाणार हे मला अलिकडेच समजलं. इतर गोष्टी मी पत्रकार परिषदेत बोलेन, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number