उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यासाठी मॉरिशस येथे गेले असून त्या दरम्यानचे फडणवीसांचे व्हिडिओस काही वेगळंच सांगत आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आणि मॉरिशसच्या व्यापारी समूहासोबत पर्यावरण विषयक करार करण्याचे या दौऱ्यात नियोजित करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी ते पुढील दोन दिवस मॉरिशस येथे असतील या दौऱयावर जाताना फडणवीसांनी घातलेला अर्ध्याभाईचा टीशर्ट एक गुपित उघडं करून गेला आहे. फडणवीसांचं वजन कमी झाल्याचं यातून दिसतं आहे. फडणवीस यापूर्वी अनेकदा त्याच्या वजनामुळे ट्रोल झाले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टप्यात फणवीसांनी वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. सुरुवातीला त्याचा फायदा ही दिसून आला.मात्र कामाच्या धावपळीत हे वजन कमी करण्याचे प्रयत्न मागे पडले आणि पुन्हा फडणवीसांचे वजन वाढले. उपमुख्यमंत्री पदाच्या काळात स्वताच्या वजनाला कमी करण्यासाठी फडणवीस मेहनत घेत आहेत.. त्यांचे हे फोटोज पाहून फडणवीस बारीक झालेत अशा चर्चा सुरु झाल्या .फडणवीसांनी आपले वजन कमी सर्वांचे लक्ष वेधले आहे.फडणवीस यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून गेल्या तीन महिन्यात १८ किलोने वजन कमी केले आहे. त्यांचे वजन तब्बल १२२ किलो होते. त्यानंतर फडणवीसांनी संतुलित आहार, पथ्य, नियमित व्यायाम आणि आवश्यक औषधांच्या जोरावर स्वत:च वजन १०४ किलोपर्यंत कमी केले. सध्या ८८ ते ९० किलोपर्यंत वजन कमी करण्याचे लक्ष्य फडणवीसांनी ठेवले आहे.अनेकदा फडणवीसांना त्यांच्या पोटामुळे ट्रोल केलं जायचं. मात्र आता त्यांच्या कमी झालेल्या वजनामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Towards Mauritius.. 🇲🇺#MaharashtraMauritius #Mauritius #IndiaMauritius #Historic #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharajKiJai pic.twitter.com/5RPkGp6mZg — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2023