मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला असून, एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः एकमेकांवर वाहनं आदळली आहेत. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जात आहे. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. अपघातात एकूण अकरा […]

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला असून, एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः एकमेकांवर वाहनं आदळली आहेत. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जात आहे. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. अपघातात एकूण अकरा वाहनं एकमेकांना आदळली आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढत आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे करणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ काम करणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टळाणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number