दर दिवशी कोट्यवधी लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत असतात. यात सगळ्यात जास्त समावेश असतो तो म्हणजे रक्ताशी संबंधित समस्यांचा. रक्ताशी संबंधित आजारांपैकी एक म्हणजे हिमोफिलिया. दरवर्षी अनेक लोक या आजाराला बळी पडतात. यामुळेच हिमोफिलियाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 17 एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा केला जातो.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हिमोफिलिया हा एक अनुवांशिक विकार आहे. हिमोफिलिया हा एक दुर्मिळ रक्त विकार आहे, ज्यामुळे रक्ताची व्यवस्थित गुठळी न होता ते पातळ राहतं. रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांच्या अभावामुळे असे घडते. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दुखापत झाल्यास त्यांना खूप रक्त स्त्राव होतो. हिमोफिलियामुळे गुडघे, घोटे आणि कोपर ह्या बाह्य अवयवांमध्ये तर काही वेळेला अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
हिमोफिलियाची लक्षणे:
– लसीकरणानंतर असामान्य रक्तस्त्राव
– लघवी किंवा मलत्याग करताना रक्तस्त्राव
– लहान मुलांमध्ये अस्पष्ट चिडचिड
– सांध्यांमध्ये वेदना ,सूज किंवा घट्टपणा
– नाकातून रक्तस्त्राव होणे