उष्माघातापासून असा कराल बचाव !

एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढू लागलेल्या उष्णतेने सगळेच त्रस्त झाले आहेत. उष्णतेच्या तडाख्यापासून बचाव करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. या भर उन्हाळ्यात तग धरण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी काहिली कमी करण्यासाठी काय करावे जाणून घेऊया. – विशेषत: सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान घर बाहेर पडलात तर सनस्क्रीन, डोक्यावर टोपी आणि टॉवेलसारखे हलके कपडे घालण्यास विसरू नका – शारीरिक […]

उष्माघातापासून असा कराल बचाव !

एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढू लागलेल्या उष्णतेने सगळेच त्रस्त झाले आहेत. उष्णतेच्या तडाख्यापासून बचाव करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. या भर उन्हाळ्यात तग धरण्यासाठी आणि उन्हामुळे होणारी काहिली कमी करण्यासाठी काय करावे जाणून घेऊया.

– विशेषत: सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान घर बाहेर पडलात तर सनस्क्रीन, डोक्यावर टोपी आणि टॉवेलसारखे हलके कपडे घालण्यास विसरू नका

– शारीरिक तापमान वाढेल किंवा शरीर तापेल अशा प्रकारचे व्यायाम करणे टाळावे.

– शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड अन्न आणि पेय यांचा आहारात समावेश करावा.

– 35 अंशांपेक्षा कमी तापमानात इलेक्ट्रिक फॅनचा वापर करा.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उन्हाळ्याच्या हंगामात वाहणारे उष्ण वारे म्हणजे उष्णतेची लाट. यावेळी बऱ्याच वेळा मानवी शरीर जे सहन करू शकत नाही त्यापेक्षा जास्त उष्ण हवामान असल्याने उष्माघाताचा धोका वाढतो.
उष्माघाताची प्रमुख कारणे – पुरेसे पाणी न पिणे, अपुरा आहार , हृदय किंवा श्वासोच्छवासाच्या आजाराने बाधित व्यक्ती.

सर्वात जास्त धोका कोणाला ?

– वृद्ध लोकांना उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो.

– केअर होममध्ये एकटे राहणारे लोक.

– नियमितपणे अनेक औषधे घेणारे लोक.

– अगदी लहान मुले तसेच शाळेत शिकणारी मुले.

– व्यसनांच्या आहारी गेलेले लोक.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number