‘राजापुरातील टोल सुरू होणार नाही’ – मंत्री उदय सामंत

गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील हातिवले टोलनाका सुरु करण्यात आला होता. मात्र स्थानिकांचा या टोलनाक्याला विरोध होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी हा टोलनाका बंद करत असल्याची माहिती दिली. आज बुधवारी […]

‘राजापुरातील टोल सुरू होणार नाही’ – मंत्री  उदय सामंत

गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील हातिवले टोलनाका सुरु करण्यात आला होता. मात्र स्थानिकांचा या टोलनाक्याला विरोध होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकणातील राजापूर हातिवले येथे सुरू करण्यात आलेला टोल एका दिवसात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी हा टोलनाका बंद करत असल्याची माहिती दिली. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून हा टोल नाका बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी माहिती दिली.

राजापूर हातिवले टोल नाक्यापासून ११ किलोमीटर अलीकडे व पलीकडे टोल माफी मिळायला हवी अशी स्थानिकांची मागणी आहे आणि यावरून वाद निर्माण झाले आहेत. ते वाद आता समन्वयाने मिटत आले आहेत. ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल सुरू करावा असा नॅशनल हायवेचा नियम आहे. पण तरीही हे काम ऐशी ते पंच्याऐशी टक्के पूर्ण झालेले असतानाही हा टोल सुरू करण्याला आपण परवानगी नाकारली आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

११ एप्रिलपासून हा टोलनाका सुरु करण्यात आला होता. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांच्या खिशावर भार पडण्यास सुरुवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर टोल वसुली करण्यास मान्यता दिल्यानंतर टोल वसुलीस सुरुवात झाली. हातिवले टोलनाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी या टोलनाक्याला विरोध केला होता.

दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या टोल वसुलीमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. अखेर स्थानिकांचे टोल वसुलीच्या मुद्यावरून समाधान होईपर्यंत टोल वसुली होणार नसल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. आजपासून हातिवले टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number