‘मतभेद विसरा, सोबत या’

राज्यात शिवसेना फुटीनंतर शिवसेनेच्या उद्धव आणि शिंदे गटामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी होताना पहायला मिळत आहे. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीकेची सरबत्ती सुरुच ठेवली आहे. दरम्यान, ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवर काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेने दावा ठोकला आहे. शाखेवर कब्जा केल्यावर शिवसेनेचे उद्धव आणि शिवसेनेतील कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावर खासदार संजय राऊतांनी शिवसेनेला […]

‘मतभेद विसरा, सोबत या’

राज्यात शिवसेना फुटीनंतर शिवसेनेच्या उद्धव आणि शिंदे गटामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी होताना पहायला मिळत आहे. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीकेची सरबत्ती सुरुच ठेवली आहे. दरम्यान, ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवर काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेने दावा ठोकला आहे. शाखेवर कब्जा केल्यावर शिवसेनेचे उद्धव आणि शिवसेनेतील कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावर खासदार संजय राऊतांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

“हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. पण, आमचा शिवसैनिक मागे कुठेही हटणार नाही. शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा हा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण, या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर होत आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचं काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करू नका, समोर या. हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. मात्र, लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे म्हणाले, “मी विरोधकांनासुद्धा विनंती करतो की, आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. आमची नेहमीच त्यांना साथ राहिल”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number