धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

कसब्यातील दणदणीत विजयानंतर सोमवारी रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीला आलेल्या रवींद्र धंगेकरांचं शरद पवारांनी यावेळी कौतुक केलं आहे. धंगेकर दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतात म्हणून २ पायांवर चालणाऱ्यांनी मतं दिली, असं म्हणत शरद पवारांनी धंगेकरांचं कौतुक केलं. रविंद्र धंगेकरांनी गेली ३० वर्षे जे काम केलंय त्यालाच लोकांनी मत दिल्याचं शरद पवार म्हणाले. यावेळी […]

धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

कसब्यातील दणदणीत विजयानंतर सोमवारी रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीला आलेल्या रवींद्र धंगेकरांचं शरद पवारांनी यावेळी कौतुक केलं आहे. धंगेकर दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतात म्हणून २ पायांवर चालणाऱ्यांनी मतं दिली, असं म्हणत शरद पवारांनी धंगेकरांचं कौतुक केलं. रविंद्र धंगेकरांनी गेली ३० वर्षे जे काम केलंय त्यालाच लोकांनी मत दिल्याचं शरद पवार म्हणाले.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज यावेळी महाविकास आघाडीसोबत होता. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे.

‘धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती. कारण नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ. याच्या खोलात जायची गरज नाही. परंतू गिरीष बापटांनी कसब्यात सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध ठेवले. त्यामुळे कसबा इतके दिवस अवघड होता. पण यावेळी भाजपने बापटांना विश्वासात घेतलं की नाही माहित नाही पण धंगेकरांनी ही जागा काढली, असंही पवार म्हणाले.

कारण हा उमेदवार टू व्हिलरवर फिरणारा होता. तो कधी कारमध्ये बसत नाही. लोकांमधला होता. त्याचा निश्चितच फायदा झाला, हा विजय महाविकास आघाडीला उभारी देणारा आहे. महाविकास आघाडीचे सगळे घटक राबले त्याचा हा फायदा झाला आहे, असंही पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number