राष्ट्रवादी एक, भावी मुख्यमंत्री अनेक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचंही भावी मुख्यमंत्री उल्लेख केलेलं पोस्टर लावण्यात आलं होतं. दरम्यान, आता सुप्रिया सुळेंचे बॅनरही बॅनर झळकल्यामुळे राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादीतही चर्चांना उधाण आलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे म्हटले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

राष्ट्रवादी एक, भावी मुख्यमंत्री अनेक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचंही भावी मुख्यमंत्री उल्लेख केलेलं पोस्टर लावण्यात आलं होतं. दरम्यान, आता सुप्रिया सुळेंचे बॅनरही बॅनर झळकल्यामुळे राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादीतही चर्चांना उधाण आलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे म्हटले गेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी पंतप्रधान, भावी पंतप्रधान असे म्हणायची पद्धत आहे. माझ्या अनुभवातून मी खुप काही शिकलो. त्यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का ? असा सवाल करत ज्याला ज्याला भावी वाटतोय. त्यामुळे जे जे भावी आहेत, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवारांचा फोटोदेखील भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number