आयोगाने सरकारी विनंती ऐकली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होणार आहे. सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी आंदोलन करीत होते. यासंदर्भात त्यांनी विविध मोठ्या राजकीय नेत्यांची भेट देखील घेतली होती. पण आता त्यांच्या मागणीला यश आल्याचे पाहायला […]

आयोगाने सरकारी विनंती ऐकली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होणार आहे. सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी आंदोलन करीत होते. यासंदर्भात त्यांनी विविध मोठ्या राजकीय नेत्यांची भेट देखील घेतली होती. पण आता त्यांच्या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.

“राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.” असल्याचे एमपीएससीने ट्विट करून जाहीर केले आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा मी स्वत: त्यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली होती. शासन सुद्धा विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं. या संदर्भात आम्ही एमपीएससीला विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. यामध्ये आम्हाला कोणतही राजकीय श्रेय घ्यायचं नाही आणि घ्यायची आवश्यकताही नाही. पण काहीजण त्यात विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत, असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number