‘पवारांना फडणवीस नको होते ?’

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील गौप्यस्फोट बाहेर येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच यावर भाष्य केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा […]

‘पवारांना फडणवीस नको होते ?’

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील गौप्यस्फोट बाहेर येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच यावर भाष्य केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होते. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको. असाच त्यांचा अजेंडा आहे. देवेंद्र फडणवीस यांना विरोध करायचा आणि ते मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात, असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले,’शरद पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस भुई सपाट होईल. त्यामुळे शरद पवारांना भाजप सोबत युती हवी होती. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते’, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number