१९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत शिवजयंतीच्या निमित्तानं अमरावती येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीच्या या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला आहे. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असेलेल तुषार उमाळे यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले याचे संदर्भ देत असताना भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी हस्तक्षेप करत तुषार यांना टोकलं आणि ये शहाणे हे बंद कर अशा शब्दात भाषण बंद करण्यास सांगितलं
शिवव्याख्याता तुषार उमाळे भाषण करत असताना, तो शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होता. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अनिल बोंडे यांनी भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला. “ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का?” असं अनिल बोंडे यांनी विचारलं. यावर संबंधित तरुणाने खासदार अनिल बोंडे यांनी उलट उत्तर दिलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा प्रतिप्रश्न विचारला. यावेळी मंचावर असलेले मान्यवर उठून गेलेत. दरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय.
तेव्हा तुषार यांनीही संताप व्यक्त करत तुम्ही मुर्ख आहात का? असा सवाल करत प्रत्युत्तर दिलं. तसेच लोकप्रतिनिधी असा किंवा कोणीही आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही, महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा मला संविधानानं अधिकार दिला आहे ज्याला ऐकायचं त्यानं ऐकावं आणि ज्याला नाही ऐकायचं तर चुपचाप निघून गेले तरी चालेल. अस थेटच बोंडेंना म्हटलं. त्यामुळे काही काळ मंचावर गोंधळ निर्माण झाला होता.
यासर्व प्रकरणावर अनिल बोंडे यांनी शिवरायांची बदनामी थांबवली हा गुन्हा केला का? असा सवाल विचारला आहे.