जयंत पाटलांना पडले मुख्यमंत्री पदाचे स्वप्न

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुंबईत काही पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी […]

जयंत पाटलांना पडले मुख्यमंत्री पदाचे स्वप्न

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुंबईत काही पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. जयंत पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

या आधी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, आता जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झालीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number